बिब्लिओग्राफीचा इतिहास

भाषांतर डेटाबेसच्या बिब्लोग्राफीची गरज ही खूप पुर्वीच जाणवलेली आहे. Anukriti.net भाषांतराच्या माहितीची व सेवेची साईट केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, साहित्य अकादमी व नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया या भारतातील तीन आद्य संस्थांनी- मिळून २००२ मध्ये विकसित केली आहे. जवळजवळ २०००० शीर्षकांची माहिती गोळा केल्या गेली व शोधता येईल असा/घेण्याजोगा डेटा अनुकृतीने निकसित केला. तथापि डेटा ऑथेंटिकेट करण्याची व

जून २००८ मध्ये NTM ची सुरूवात झाली आणि अनुकृतीला त्यामध्ये विलीन केल्या गेले. भाषांतराच्या डेटाबेसची बिब्लिओग्राफी बनवण्याचे काम एनटीएमने सुरू केले. २०११ मध्या प्रकल्पाचे नूतनीकरण करून प्रकल्प नव्याने सुरू केला गेला. एक रोडमॅप बनवला गेला व विविध माध्यमातून डेटा गोळा केल्या गेला. बऱ्याच भारतीय विद्यापिठे, ग्रंथालये, भाषांतर एजन्सीज, लिटररी सोसायटीज व संस्थांशी संपर्क निर्माण केल्या गेले. आम्ही जवळजवळ ७०,००० शीर्षकांची माहिती गोळा केली आहे. य़ा शीर्षकांची चाळण प्रक्रिया व डिजिटाईजेशन होणे आवश्यक आहे.

सप्टेंबर २०११ मध्ये, भाषांतराच्या संदर्भसूची बिब्लिओग्राफीच्या डाटाबेसच्या शीर्षकांचे कार्यशाळेदरम्यान प्रो. देवी यांनी प्रत्येक भाषांतरीत शीर्षकासाठी एक युनिक आयडी तयार करण्याची कल्पना सुचवली व त्यासाठी एक पद्धतही सुचवली. नव्हेंबर २०११ मध्ये वडोदरा येथे एका दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन केल्या गेले.