|  | 
                 
         
         | 
        परिभाषा/ पारिभाषिक संज्ञा
                         
    
        
            
                | साहित्येतर ग्रथांच्या भाषांतरात पारिभाषिक व शास्त्रीय संज्ञांचे प्रमाणीकरण आणि भाषांतर
                    करणे ही प्राथमिक गरज आहे. आजवर भारतीय भाषांमध्ये वापरळ्या गेलेल्या पारिङाषिक संज्ञांमध्ये
                    एकरूपता दिसत नाही. तामिळ, बंगाली यासारख्या काही भाषा सोडल्या तर इतर भाषांसाठी शब्दार्थकोश
                    नाहीत. एनटीएम् सीएसटीटीच्या संगनमताने भारतीय भाषेतील पारिभाषिक संज्ञांचे प्रमाणीकरण
                    करते. भारतीय अनुवाद अभियानाच्या प्रयत्नामुळे कमिशन फॉर सायंटिफिक अड टेक्निकल टर्मिनॉलॉजीला
                    बळकटी मिळेल. २२ भारतीय भाषेत शास्त्रीय व पारिभाषिक संज्ञांच्या वाढीला व त्यांना
                    निश्चिती देण्याच्या कामी येईल. ज्यामुळे साहित्येतर ग्रंथांचे लवकर/ सहज व चांगले
                    भाषांतर शक्य होईल. |   |  |  |